मुंबई : कोरोनाकाळात पालकांनी खासगी शाळांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. पालकांना खासगी शाळेची भुरळ पडली होती. मात्र आता सरकारी शाळांना प्राधान्य देताना अनेक पालक दिसत आहेत. प्रथम फाऊंडेशन या संस्थेकडून दरवर्षी शालेय स्तरावरील शैक्षणिक स्थितीची देशपातळीवर पाहणी केली जाते. यामधून ही माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फाऊंडेशन या संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा, त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा लेखाजोखा मांडणारा ‘असर’ अहवाल प्रकाशित केला जातो. दोन वर्षांपासून देशभरातील शाळांमधून प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाची जागा ऑनलाइन वर्गानी घेतली आहे. करोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणावर दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रथम फाऊंडेशनने यंदा ग्रामीण भागातील परिस्थितीची पाहणी करून वार्षिक अहवाल सादर केला आहे.


पालकांचा सरकारी शाळांकडे का वाढला ओढा? 


कोरोनाकाळात शहरांकडून ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.


कोरोनामुळे अनेक क्षेत्रांतील अर्थकारणावर मोठा परिणाम.


कोरोनाकाळात अनेक कुटुंबांच्या उत्पन्नात घट.


कोरोना खासगी शाळांचे शुल्क आवाक्याबाहेर.


छोटया खासगी शाळांचे अर्थकारणही ढासळले त्यामुळे अनेक शाळा बंद.


राज्यातील ९९० गावांतील सहा ते १६ या वयोगटातील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात आली. खासगी शाळांबाहेर आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची रांगच रांग असायची. यामुळे शासकीय शाळा बंद कराव्या लागल्याचे चित्र दिसत होते. कोरोनाकाळात मात्र या परिस्थितीत बदल झाला असल्याचे ‘असर’च्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.


खासगी शिकवण्यांतील विद्यार्थ्यांमध्ये वाढ


शाळांमधून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन शिक्षणापेक्षा खासगी शिकवण्यांवरील भर करोनाकाळात वाढल्याचे दिसत आहे. राज्यात २०१८ च्या तुलनेत यंदा खासगी शिकवण्यांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २०.७ टक्क्य़ांनी वाढले. हे प्रमाण २०१८ मध्ये १४.२ टक्के होते. त्यातही पहिली आणि दुसरीच्या वर्गातील खासगी शिकवण्यांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.